पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन पनवेल कोळीवाड्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 15) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते स्वागत करून त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. या प्रवेशामुळे शेकापला शहरात आणखी एक झटका बसला आहे.
या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, सरचिटणीस अमित ओझे, रूपेश नागवेकर, विनायक मुंबईकर, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, हारूशेठ कोळी, रोशन ठाकूर, पवन सोनी आदी उपस्थित होते.
या वेळी पनवेल कोळीवाडा येथील शेकापचे आकाश भगत, राहुल पाटील, केतन भोईर, राहुल शेलार, अरुण शेलार, रवी भोईर, मच्छिंद्र भोईर, अरुण भोईर, किरण भोईर, विवेक शेलार यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
आज कोळीवाड्यातील या प्रवेशामुळे ताकद वाढली असून तुम्हाला पक्षात मान-सन्मान दिला जाईल अशी ग्वाही शहर अध्यक्ष अनिल भगत यांनी दिली. आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्यासाठी प्रत्येकाने सिंहाचा वाट उचलावा, असे आवाहनही त्यांनी केले.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …