पनवेल : वार्ताहर
पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. कौटुंबिक कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतुन तिला जिवंत जाळून फरार झालेल्या पतीला पनवेल शहर पोलिसांनी 33 वर्षानंतर अटक केली आहे. बाबु गुडगीराम काळे (वय 70) असे या आरोपी पतीचे नाव आहे.
आरोपीने 1991मध्ये पनवेलमध्ये असताना पत्नीला जिवंत जाळून पलायन केले होते. तेव्हापासून फरार असलेला हा आरोपी 33 वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी परभणी येथून त्याला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्याची 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
या प्रकरणातील आरोपी बाबु काळे हा 1991 मध्ये पत्नीसह पनवेलमध्ये राहण्यास होता. त्यावेळी त्याचे पत्नीसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणादरम्यान आरोपी बाबु काळे याने पत्नीवर रॉकेल टाकून तिला जाळले होते. गंभीररीत्या भाजलेल्या बाबुच्या पत्नीला सायन हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी बाबूच्या पत्नीने दिलेल्या जबाबावरून पनवेल शहर पोलिसांनी बाबुविरोधात गुन्हा दाखल केला होता. उपचारादरम्यान बाबुच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर बाबु काळे हा फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी बाबुविरोधात कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता.
Check Also
गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …
RamPrahar – The Panvel Daily Paper