Breaking News

सीकेटी विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (दि. 7) ‘रंग मराठी कलाकारांचा’ या संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात झाले. या सोहळ्याला संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे कार्यकारिणी सदस्य संजय भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्नेहसंमेलनाला मुंबई पूर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या उपनिरीक्षक भक्ती गोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक कैलास सत्रे यांनी विद्यालयाच्या विविध उपक्रमांची तसेच या वर्षी विद्यालयाला जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हा पुरस्कार प्राप्त झाला असल्याची माहिती दिली.
विद्यालयातील विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना या वेळी बक्षिसे देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रंग मराठी कलाकारांचा या विषयाला अनुसरून स्नेहसंमेलनामध्ये नृत्याविष्कार सादर केले.
स्नेहसंमेलनाला माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, संस्थेचे सचिव डॉ. एस.टी. गडदे, प्राचार्य प्रशांत मोरे, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, सुभाष मानकर, नीलिमा शिंदे, पर्यवेक्षिका वैशाली पारधी, कैलास म्हात्रे यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply