अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड-2021ने शनिवारी (दि. 20) राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांना त्यांनी प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख व पारदर्शक पद्धतीने नवनवीन उपक्रम राबवून उत्तम सेवा बजावल्याने सन्मानित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी आपल्या आतापर्यंतच्या संपूर्ण प्रशासकीय सेवेत मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, सहसचिव, कामगार आयुक्त आणि जिल्हाधिकारी अशा विविध पदांवर अत्यंत उल्लेखनीय प्रशासकीय कामगिरी केली आहे. आता रायगड जिल्ह्यासाठीही ते विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.