पनवेल ः रामप्रहर वृत्त
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने उलवे नोडमध्ये 23 ते 25 जानेवारीपर्यंत होणार्या नमो चषक 2025 भव्य क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून या संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 20) उलवे नोड येथे नमो चषक स्पर्धास्थळी अंतिम आढावा बैठक पार पडली.
पनवेल आणि उरण भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नमो चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भात आयोजनातील विविध समित्यांची बैठक पार पडली. या बैठकीस भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, भाजपचे जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, उलवे नोड अध्यक्ष अमर म्हात्रे, विजय घरत, भार्गव ठाकूर, विश्वनाथ कोळी, हेमंत ठाकूर, सागर ठाकूर, कबड्डी प्रशिक्षक सुर्यकांत ठाकूर, क्रीडा प्रशिक्षक विनोद नाईक, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, शरीरसौष्ठवपटू दिनेश शेळके, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, ज्योत्सना ठाकूर, स्वप्नील ठाकूर, रोहित जगताप, किशोर पाटील, अंकुश ठाकूर, व्ही.के. ठाकूर, मदन पाटील, सुधीर ठाकूर, दिनेश खानावकर, रोहित जगताप, सुहास भगत, जयवंत देशमुख, हेमंत ठाकूर, धीरज उलवेकर, गौरव कांडपिळे, नाना देशमुख, सीमा पाटील यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
नमो चषक स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी विविध प्रकारच्या 17 समिती स्थापित करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने या समितीकडून आपापल्या कामाचा आढावा घेण्यात आला. उत्कृष्ट आणि भव्य आयोजनातून हा नमो चषक यशस्वीपणे करण्यासाठी समितीमधील प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याने जबाबदारी पार पाडावी, अशी सूचना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी केली. दरम्यान, त्यांनी येथे होणार्या स्पर्धेच्या अनुषंगाने मैदानाची पाहणी केली तसेच मार्गदर्शक सूचना केल्या.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …