माणगावात आगरी समाजाकडून नायब तहसीलदारांना निवेदन
माणगाव : प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आगरी समाज माणगाव विभाग शैक्षणिक व सामाजिक विकास मंडळ यांच्याकडून माणगाव तालुका निवासी नायब तहसीलदार भाबड यांना निवेदन देण्यात आले.
दि. बा. पाटील यांनी आपले सर्व आयुष्य सामाजिक कार्यासाठी वाहून घेत असताना ते येथील शेतकरी, कष्टकरी, कामगार, प्रकल्पग्रस्त, भूमिहीन शेतकरी यांच्या हितासाठी आयुष्यभर झटले. प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के भूखंड मिळवण्यासाठी निर्धार व अंमलबजावणीसाठी लढा उभारून तो यशस्वी केला. अशा जनतेचे कैवारी, अखिल समाजाचे आधारवड चार वेळा विधानसभेचे आमदार, एकवेळ विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपदी व दोन वेळा संसदेत खासदार म्हणून निवडून येऊन अखिल जनतेला न्याय मिळवून दिला. अनेक लोकोपयोगी कामे केली. अशा त्यागी, तपस्वी लोकनेत्याचे कार्य नव्या पिढीला स्पुर्तिदायी ठराव यासाठी त्यांच्या कर्मभूमीत त्यांच्या स्मृती जागरुक रहावी यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास त्यांचेच नाव द्यावे, असे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील, सचिव गजानन पाटील, कार्याध्यक्ष सिद्धार्थ म्हात्रे, सहसचिव राजाराम जांभळे, प्रसिद्धी प्रमुख संजय भोईर, राजेंद्र भगत, राजन पाटील, काशिनाथ गाणेकर आदी उपस्थित होते.