Breaking News

रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा

पनवेल : प्रतिनिधी

रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि राज्य निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 07 ते 09 जूनपर्यंत करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील बॅडमिंटनपटूंसाठी सुवर्णसंधी असलेली ही स्पर्धा 11, 13, 15, 17 व 19 वर्षांखालील मुले, 11, 13, 15, 17 व 19 वर्षांखालील मुली, 13, 15, 17 व 19 वर्षांखालील दुहेरी मुले, 13, 15, 17 व 19 वर्षांखालील दुहेरी मुली, 17 वर्षाखालील दुहेरी मिश्र गट, खुला गट महिला व पुरुष, मिश्र दुहेरी अशा विविध गटात ही स्पर्धा होणार आहे.  01 जून 2019 ही नावनोंदणीची शेवटची तारीख असून, यासाठी खेळाडूंनी https://www.spyn.co/event/5NQ4 या संकेत स्थळावर, तसेच रवींद्र भगत (9769229916), के. के. शिवकुमार  (8356051067, 7039053886), किंवा संदीप पाटील (9870416989) यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेचा फायदा सर्व बॅडमिंटनपटूंनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे व्यवस्थापकीय संचालक व रायगड जिल्हा बॅडमिंटन बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी केले आहे.

https://www.spyn.co/event/5NQ4

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply