पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असून, शुक्रवारी (दि. 23) नव्या 169 रुग्णांची आणि सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 218 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 91 व ग्रामीण 34) तालुक्यातील 125, अलिबाग 13, पेण 10, खालापूर सात, महाड सहा, उरण चार, रोहा तीन आणि कर्जत तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यात तीन, उरण दोन आणि मुरूड तालुक्यात एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 52,932 आणि मृतांची संख्या 1518 झाली आहे. जिल्ह्यात 49,603 जण कोरोनामुक्त झाल्याने 1811 विद्यमान रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.