पनवेल : रामप्रहर वृत्त
पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी पाऊल उचलले पाहिजे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 24) पनवेल महापालिकेच्या विविध कामांच्या शुभारंभावेळी केले.
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून कामोठे सेक्टर 15 येथे सिडको हस्तांतरीत गॅस शवदाहिनी तसेच कळंबोली मॅकडॉनल्डसमोर सार्वजनीक शौचालय बांधण्यात आले आहे. शवदाहिनीचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर आणि सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमांना माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, बबन मुकादम, अमर पाटील, विकास घरत, विजय चिपळेकर, राजेंद्र शर्मा, माजी नगरसेविका मोनिका महानवर, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, भाऊ भगत, हर्षवर्धन पाटील, हरजिंदर कौर, विद्या तामखडे, प्रदीप भगत, राजेश गायकर, अशोक मोटे, उपायुक्त वैभव विधाते यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
Check Also
पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …
RamPrahar – The Panvel Daily Paper