पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमधील इयत्ता सातवीतील विद्यार्थी हिृदय प्रभाकर गाणेकर हा राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान भारत सरकार आयोजित इन्स्पायर मानक पुरस्कार 2024-25चा मानकरी ठरला आहे. याबद्दल त्याला पुरस्कारूपी 10 हजार रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत.
राष्ट्रीय पुस्काराबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी हिृदय गाणेकरचे अभिनंदन करून गौरविले.
या वेळी शाळेचे चेअरमन परेश ठाकूर, स्कूलच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, रयत शिक्षण संस्था रायगड विभागाचे सहाय्यक निरीक्षक श्री जगताप उपस्थित होते. त्यांनीदेखील हिृदयचे कौतुक केले.
Check Also
खास महिला दिनानिमित्तमराठीतील पाच लक्षवेधक अभिनेत्री
मराठी चित्रपटसृष्टीच्या गौरवशाली इतिहासात अनेक गुणी अष्टपैलू, गुणी अभिनेत्रींचा सहभाग आहे. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक …