Breaking News

कार्यकर्त्यांनो, मतदारांपर्यंत पोहोचा : लोकनेते रामशेठ ठाकूर

कामोठे : प्रतिनिधी

होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक मतदारही. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहचावे. त्याद़ृष्टीने काम करा आणि भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 31) कामोठे येथे केले. ते प्रचार सभेत बोलत होते.

महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कामोठे येथील वामनराव पै सभागृहात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला खासदार श्रीरंग बारणे, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख शिरिष घरत, सल्लागार बबन पाटील, भाजप तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, प्रभाकर गोवारी, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे, रायगड महिला संपर्क प्रमुख किशोरी पेडणेकर, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, जिल्हा सरचिटणीस दर्शना भोईर, नगरसेवक विकास घरत, विजय चिपळेकर, गोपीनाथ भगत, दिलीप पाटील, प्रदीप भगत, पुष्पा कुत्तरवडे, कुसुम म्हात्रे, संतोषी तुपे, अरुणा भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्य मान्यवरांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्षम नेतृत्व देशाला पुन्हा लाभावे यासाठी, तसेच जनहिताकरिता खासदार श्रीरंग बारणेंना निवडून देण्याचे आवाहन आपल्या भाषणात केले.

Check Also

रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी …

Leave a Reply