पेण : रामप्रहर वृत्त
सावरोली येथील कोप्रान फार्मा लिमिटेड कंपनीत भाजप पुरस्कृत जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण संघटनेचे सल्लागार तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि.24) झाले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपची संपूर्ण ताकद लावणार असल्याची ग्वाही दिली.
सावरोली येथील कोप्रान फार्मा कंपनीतील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्विकारले आहे. त्या पार्श्वभुमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत गुरुवारी द्वारसभा आणि जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या वेळी पहलगाम येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, कंपनी व्यवस्थापन जर कामगारांना न्याय देत असेल, तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत, मात्र कोणत्याही परिस्थितीत जर व्यवस्थापनाने कामगारांना धमकावण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना वठणीवर आणण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, असा स्पष्ट इशारा दिला तसेच ज्या कामगारांनी युनियनवर विश्वास ठेवला आहे, त्यांचा विश्वास आम्ही निश्चितपणे सार्थ ठरवणार तसेच कामगारांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी संघटना नेहमीच खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणार असे आश्वासन दिले.
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष रवी नाईक, संघटक रवींद्र कोरडे, विश्वास पाटील, भाजपचे खालापूर पूर्व मंडळ अध्यक्ष सानी यादव, उरण तालुका कामगार आघाडीचे अध्यक्ष चंद्रकांत कडू, रोहिदास घोसाळकर, अमर घोसाळकर, रणजित सावंत, विजय वैलमारे आदी पदाधिकारी, कामगार उपस्थित होते.
Check Also
गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …
RamPrahar – The Panvel Daily Paper