मोहोपाडा : प्रतिनिधी
बारवई ग्रामपंचायत हद्दीतील बारवई आदीवासीवाडी व समतानगर आदीवासीवाडीतील बांधवांनी शेकाप, उध्दव ठाकरे गटाला रामराम करत बारवई ग्रामपंचायत सरपंच अॅड. नियती बाबरे व निलेश बाबरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहिर पक्षप्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजपमध्ये शाल व पुष्पगुच्छ देवून आभार मानले.
या वेळी आमदार महेश बालदी यांनी भाजप पक्षात प्रवेश केलेल्यांचे स्वागत करून आम्ही कायम आपल्या पाठीशी राहू असे सांगितले. नियती निलेश बाबरे यांच्यासोबत वावेघर ग्रामपंचायतीचे सदस्य निशा नितीन घरत, अमृता मोळी, माजी सदस्य नितीन घरत, अमित माळी, वावेघर येथील युवा कार्यकर्ते अमोल माळी, अभिजित माळी, आदीत्य माळी, निखील माळी, दापीवली येथील रूपेश गाताडे, चेतन हातमोडे, बारवई ग्रामपंचायत सदस्य उषा किसन वाघमारे, पंढरीनाथ कातकरी यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्याला आमदार महेश बालदींसह भाजप कर्नाळा मंडळ अध्यक्ष मंगेश वाकडीकर, गुळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, पोयंजे पंचायत समिती अध्यक्ष प्रवीण ठाकूर, गुळसुंदे पंचायत समिती अध्यक्ष सुनील माळी, वावेघर सरपंच गुरुनाथ गाताडे, बारवई येथील निलेश बाबरे, जे.डी. पाटील, बारवई बुथ अध्यक्ष सुनील दळवी, विजय बाबटे, कसळखंडचे माजी सरपंच अनंत पाटील, प्रवीण खंडागळे, ज्ञानेश्वर सुर्वे, राम गाताडे, वावेघर माजी सरपंच विजय चव्हाण, भाजप महिला मोर्चा गुळसुंदे विभाग अध्यक्ष रेश्मा माळी, प्रतिक भोईर, मंगेश लबडे आदी उपस्थित होते.
Check Also
खारघर हिल महापौर मॅरेथॉन प्रोमो रनला उत्तम प्रतिसाद
खारघर ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने रविवारी (दि.19) आयोजित करण्यात आलेल्या खारघर हिल महापौर मॅरेथॉन …
RamPrahar – The Panvel Daily Paper