Breaking News

‌‘जनसेवेचे अमृतपर्व‌’ ग्रंथाचे लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात प्रकाशन

मोखाडा : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आदिवासी दिनाचे औचित्य साधून संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त ‌‘जनसेवेचे अमृतपर्व : लोककल्याणाच्या अखंड सेवेचा प्रेरणादायी जीवनप्रवास‌’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवारी उत्साहात पार पडला.
यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित साप्ताहिक कार्यक्रमांच्या स्मरणिकेचे, प्राचार्य डॉ.ए.एन. चांदोरे, पी.पी. भालेकर, डी.ए. राजपकर, डॉ.एस.जी. मेंगाळ, प्रा.एस.के. डामसे लिखित विविध पुस्तकांचे आणि शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठीच्या महाविद्यालय माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले. याचबरोबर यशस्वी प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या समाजसेवेच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
सत्कारमूर्ती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या मनोगतात शिक्षण, संस्कार आणि समाजसेवा यांचा संगम साधत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा संदेश दिला.
माजी आमदार सुनील भुसारा, माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश निकम, नगराध्यक्ष अमोल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एन. चांदोरे, उपप्राचार्य डॉ.एस.जी. मेंगाळ, हबीब शेख, श्री. शेळके, श्री. घुले यांच्यासह प्राध्यापक, ग्रामस्थ व विद्यार्थी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा.व्ही.एम. मोरे व प्रा.आर. डी. घाटाळ यांनी केले. दरम्यान, अमृत महोत्सवी ग्रंथासाठी संपादक म्हणून प्रा.एस.आर. व्हंडे यांनी परिश्रम घेतले आहेत.
दरम्यान, लोकनेते ठाकूर यांच्या अमृत वर्षानिमित्त महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाद्वारे परिसरात वृक्षारोपण उपक्र्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते. या उपक्रमाचे नियोजन एनएसएस विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.आर. व्हंडे व प्रा.टी.एम. पराडके यांनी केले होते.


डोळखांब विद्यालयास सदिच्छा भेट
मोखाडा कॉलेज येथून परतीच्या प्रवासाच्या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी डोळखांब विद्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामीण आदिवासी भागातील शाळेने केलेली प्रगती पाहून स्कूल कमिटी व सेवक वर्गाचे कौतुक केले.
विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य तथा रायगड विभागीय समन्वय समिती सदस्य विकास चौधरी आणि प्राचार्य सी.जी. पाटील यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेचे विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे यांच्यासह शिक्षक गोखले, सापळे, मयूर पवार, प्रा.जगदीश विशे, गंगाड, पाडवी, वेदांत कोंगेरे, गणपत फर्डे, सुनील फर्डे उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यालयाचे अद्यावत कँटीन, अटल टिंकरींग लॅब, प्रयोगशाळा, ग्रंथालय, बहुउद्देशीय सभागृह आणि एकंदर कामकाज पाहून कौतुक केले तसेच अकरावी कॉमर्स शाखा सुरू करण्याविषयी सूचित करून संस्था पातळीवर सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर समाजसेवेतील हिरा -आमदार रविशेठ पाटील

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या मूट …

Leave a Reply