उरण भाजपची बैठक उत्साहात; संघटनात्मक चर्चा

उरण ः वार्ताहर

पक्ष संघटनात्मक चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्ष उरण तालुका मंडल पदधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, विभागीय प्रमुख, सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा कमिटीचे पदधिकारी यांची बैठक बुधवारी (दि. 21) द्रोणागिरी नोड येथील भागूबाई चांगू ठाकूर विद्यालय या ठिकाणी झाली. भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उरण विधानसभा प्रमुख नंदू पटवर्धन, मावळ लोकसभा समन्वयक अविनाश कोळी आदी होते. या वेळी समर्थ बूथ अभियानाबद्दल कोळी यांनी माहिती दिली. बूथ  केंद्र  प्रमुख, बूथ अध्यक्ष यांनी होऊ घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगर परिषद  निवडणुकीसाठी तयारी  करावी. 15 दिवसांत ठिकठिकाणी गावांत बैठका घ्याव्यात, तालुक्यात 32 शक्ती केंद्र व बूथ अध्यक्ष 40 आहेत त्यांनी लक्ष केंद्रित करावे. निवडणुकीत मतदान यादी आपले शस्त्र आहे. त्यामुळे मतदार यादीत ज्यांचे फोटो नाहीत त्यांची नावे वगळण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मतदार यादीत ज्यांचे फोटो नाहीत त्यांनी 31 जुलैपर्यंत तहसील कार्यालयात द्यायचे आहेत. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या धोरणाने सर्वांनी तयारीला लागा, असे सांगण्यात आले. या  बैठकीस  नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, शहर अध्यक्ष कौशिक शाह, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत घरत, जितेंद्र पाटील, कामगार नेते जितेंद्र घरत, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, उपाध्यक्ष पंडितशेठ घरत, मुकुंद गावंड, पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष राणी म्हात्रे, सरचिटणीस निर्मला घरत, शहर अध्यक्ष संपूर्णा थळी, विश्रांती रमाकांत घरत, नगरसेवक राजेश ठाकूर, नंदू लांबे, नगरसेविका जान्हवी पंडित, स्नेहल कासारे, सुरज म्हात्रे, पिरकोनचे माजी सरपंच वैभव गावंड, प्रकाश पाटील, वशेणीचे माजी सरपंच विजय म्हात्रे, जितेंद्र यादव, संदेश पाटील, मंगेश पाटील, लवेश पाटील, कृष्णा ठाकूर, राम ठाकूर, हितेश शाह, मनोहर सहतीया, मकरंद पोतदार, प्रमोद म्हात्रे, विशाल पाटेकर, विकास पाटेकर, मनोहर जामकर, अशोक म्हात्रे, भगवान घरत, चंद्रकांत कडू, दर्शन घरत, देवेंद्र घरत, मनीष पाटील, राजेश ठाकूर, विजय म्हात्रे, रोशन म्हात्रे, संतोष वर्तक, चेतन म्हात्रे, चंद्रकांत पाटील, सुनील घरत, सुरज म्हात्रे, कुलदीप नाईक, कल्पेश म्हात्रे, निलेश पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply