पनवेल ः रामप्रहर वृत्त
संघटन कौशल्य, कार्यक्षमता व पक्षशिस्तीसाठी ओळखले जाणारे अविनाश कोळी यांची भारतीय जनता पक्षाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश भाजपकडून मंगळवारी (दि. 13) राज्यातील सहा विभागात 58 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये अविनाश कोळी यांचा समावेश आहे.
भाजपने महाराष्ट्रातील विविध जिल्हाध्यक्षांची नियुक्ती प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी व स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व निर्माण करण्याच्या दृष्टीने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकता व कार्यक्षमता राखण्यासाठी पक्षाने ठोस निकष निश्चित केले, ज्यामध्ये जिल्हाध्यक्षपदासाठी 60 वर्षांखालील उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात आले आहे.
अविनाश कोळी यांचे संघटनात्मक कार्यासाठी नियोजन उत्तम प्रकारचे असते. पक्षाची ध्येयधोरणे आणि उपक्रम नेहमीच यशस्वी करत त्यांनी यापूर्वीही जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी चोख बजावली आहे तसेच निवडणुका जिंकण्यात त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. त्याचबरोबर संघटनात्मक जबाबदारीने काम केले आहे. त्यामुळे त्यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपने पुनर्नियुक्ती जाहीर केली.
अविनाश कोळी यांच्या पुनर्नियुक्तीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी ही निवड अत्यंत फलदायी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे तसेच पुढील वाटचालकरिता त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper