Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवीवर्ष पदार्पणानिमित्त खांदा कॉलनीत रक्तदान शिबिर


पनवेल : रामप्रहर वृत्त
दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे 75व्या वर्षात पदार्पण अर्थात अमृत महोत्सव वर्षनिमित्त युवा मोर्चाच्यावतीने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी रक्तदान शिबिर उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शनिवारी (दि.2) खांदा कॉलनी येथे रक्तदान शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात झाले.
या शिबिराला प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, माजी उपमहापौर सीता पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, माजी नगरसेवक अनिल भगत, गणेश कडू, गणेश पाटील, सुनील बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, सुरेखा मोहोकर, अनुराधा ठोकळ, प्रीती जॉर्ज, वृषाली वाघमारे, सारिका भगत, आदेश ठाकूर, अमरीश मोकल, रूपेश नागवेकर, विनायक मुंबईकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अभिषेक पटवर्धन, अक्षय सिंग, देवांशू प्रबाळे यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदापर्णानिमिताने विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी एक विशेष रक्तदान उपक्रम सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये दर महिन्याच्या पहिल्या रविवारी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे. हा उपक्रम संपूर्ण वर्षभर राबविण्यात येणार असून, विशेषतः थॅलेसिमिया ग्रस्त रुग्णांसाठी आणि इतर गरजू रुग्णांसाठी या रक्तदान उपक्रमाचे मोठे योगदान ठरत आहे. त्यानुसार शनिवारी खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात तिसरे रक्तदान शिबिर झाले.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply