Breaking News

सीकेटी विद्यालयात शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचे व्याख्यान

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी पदार्पणानिमित्त उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उच्च माध्यमिक विभागातर्फे शनिवारी (दि.2) संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचे शिक्षकांसाठी प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी लोकनेते रामशेठ ठाकूर, तर विशेष अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉ. एस.टी. गडदे, आदेश ठाकूर, सागर ठाकूर, संजय भगत, अनिल खोपडे, त्याचबरोबर प्राचार्य प्रशांत मोरे, मुख्याध्यापक कैलास सत्रे, संतोष चव्हाण, सुभाष मानकर व नीलिमा शिंदे, पर्यवेक्षक नीरजा अधुरी, वैशाली पारधी, स्वाती पाटील, अजित सोनवणे, के.के. म्हात्रे, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. व्याख्यानाची सुरुवात करताना प्रशांत देशमुख म्हणाले की, ज्या रयत शिक्षण संस्थेत लोकनेते रामशेठ ठाकूर कमवा आणि शिका या योजनेतून शिकले, त्याच संस्थेला कोट्यावधी रुपयांचे दान देऊन आपल्या कृतज्ञतेचेदर्शन त्यांनी घडविले आहे. असे संस्कार, संस्कृती आपण शिक्षकांनी मुलांमध्ये रुजविणे आवश्यक आहेत.
आपल्या तीस-पस्तीस वर्षाच्या सेवेमध्ये आपण हजारो विद्यार्थी घडविले असतील पण असा एक तरी विद्यार्थी घडवा की ज्याला आपण संकटात साथ दिलेली असेल. तोच खरा आपल्या जीवनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार असेल. शिक्षक कसा असावा याविषयी विचार व्यक्त करताना ते म्हणाले की, शिक्षक हा चारित्र्यवान असला पाहिजे. आपल्यासमोर जे विद्यार्थी आहेत ते आपल्याला आदर्श मानत आहेत. म्हणूनच शिक्षकांनी आपल्या चारित्र्याला जपले पाहिजे. ज्या संस्थेत आपण काम करत आहोत त्या संस्थेवर, संस्थाचालकावर, वास्तूवर, विद्यार्थ्यांवर पोटच्या मुलासारखं प्रेम करता आले पाहिजे. शिवरायांचे विचार कृतीत उतरवायचे असतील तर प्रेरणा घेऊन एकदा तरी रायगडला भेट द्या, असेही ते म्हणाले. अध्यक्षीय मनोगतात लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, आजचे हे उद्बोधक व्याख्यान जीवनात उपयोगी पडेल. व्याख्यानातील हावभाव, चढउतार, आवाज हे सर्वच गुण शिक्षकांनी घ्यावयाचे आहेत. आपल्या जीवनात चढ-उतार घडतच जाणार आहेत म्हणूनच आपलं कर्तव्य काय, आपले काम काय हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. वक्ता असावा तर प्रशांत देशमुख यांच्यासारखा असे कौतुकास्पद उदगार त्यांनी काढले. या वेळी व्याख्याते प्रशांत देशमुख यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना आपल्याकडील पुस्तक भेट दिले. योगिता जोरी यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply