पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे, सौ. शकुंतला ठाकूर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या निशा नायर यांनी श्रीलंका येथे आयोजित इंटरनॅशनल कॉन्फरेन्स व क्वालिटी एज्युकेशन 2025 या आंतरराष्ट्रीय परिषदेत सक्रिय सहभाग घेऊन विद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. याबाबत त्यांचे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विशेष अभिनंदन करून कौतुक केले.
27 ते 31ऑक्टोबर 2025 या पाच दिवसांच्या कालावधीत नेटवर्क फॉर क्वालिटी एज्युकेशन इन श्री लंका यांच्या वतीने ही शैक्षणिक गुणवत्ता आधारित परिषद पार पडली. या परिषदेत शैक्षणिक गुणवत्ता, पाठ्यक्रम विकास, विज्ञान व तंत्रज्ञान, शाळेचे विकसित नेतृत्व, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शैक्षणिक अभ्यासक्रमात क्रांती घडवणे, तसेच शाश्वत विकास ध्येये यांसारख्या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चासत्रे आणि व्याख्याने झाली. स्वप्नाली म्हात्रे यांनी चर्चासत्रांमध्ये सक्रिय भाग घेत ज्ञानाचे आदान-प्रदान केले आणि आपले विचार मांडले. त्यांनी श्रीलंकेतील दोन विद्यालयांना भेट देऊन तेथील उत्तम व्यवस्थापनाचा अनुभव घेतला.
या परिषदेत सुमारे प्राचार्यांचा सहभाग होता, तसेच विभाग आणि प्रत्येक राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान या वेळी श्रीलंकेमधील ऊवा प्रांताचे राज्यपाल जे. एम. कपिला जयसेकरा यांच्या हस्ते स्वप्नाली म्हात्रे यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करून त्यांना गौरवण्यात आले. तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि जूनियर कॉलेज कामोठे या विदयालयाचे चेअरमन व आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील प्रतिनिधित्व करणार्या सर्वच महिला प्राचार्यांचे कौतुक करून अभिनंदनही केले.
Check Also
आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …
RamPrahar – The Panvel Daily Paper