Breaking News

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिवादन

महाड : रामप्रहर वृत्त
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 3) ऐतिहासिक रायगडावर जाऊन विनम्र अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाला अभिवादन करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाराष्ट्रातील युवकांनी शिवचरित्रातून प्रेरणा घ्यावी, असा संदेश दिला. या वेळी त्यांनी महाराजांच्या समाधीस पुष्प अर्पण करून नतमस्तक होत अभिवादन केले. तत्पूर्वी पाचाड येथे राजमाता जिजाऊंना अभिवादन केले.
या वेळी त्यांच्या समवेत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, बिपीन म्हामुणकर, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, केदार भगत, रूपेश नागवेकर, प्रीतम म्हात्रे, प्रशांत मोरबाळे आदी उपस्थित होते. महाडकरांच्या वतीने म्हामुणकर व ग्रामस्थांनी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि अन्य उपस्थितांचे स्वागत केले.

Check Also

रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी …

Leave a Reply