Breaking News

पनवेल परिसरात गुरु नानक जयंती उत्साहात

लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
शीख धर्माचे पहिले गुरू आणि संस्थापक गुरु नानक देवजी यांच्या जयंती पनवेल परिसरात भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात बुधवारी (दि.5) साजरी झाली.
यानिमित्ताने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल, कळंबोली आणि खारघरमधील गुरुद्वारांमध्ये जाऊन दर्शन घेतले आणि गुरु नानक देवजींना नमन केले. त्यांनी गुरुद्वारांमध्ये भेट देऊन प्रार्थना केली आणि शीख बांधवांना शुभेच्छा दिल्या. व गुरु नानक देवजींचा संदेश आणि समानतेच्या शिकवणीचे महत्त्व अधोरेखित केले.
या वेळी ज्येष्ठ नेते जे.एम.म्हात्रे, कळंबोली अध्यक्ष अमर पाटील, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक संतोष शेट्टी,
राजू शर्मा, रवी भगत, बबन मुकादम, नरेश ठाकूर, निलेश बावीस्कर, माजी नगरसेविका मोनीका महानवर, जिल्हा उपाध्यक्ष भा.वि. आ. बबन बारगजे, दिलीप बिष्ट, अशोक मोटे, युवा मोर्चा अध्यक्ष गौरव नाईक, अमर ठाकूर, रामा महानवर, झमीर शेख, सरस्वती काथारा, अल्पसंख्याक आयोग सदस्य हॅप्पी सिंग, किरण पाटील, प्रभाग 16 अध्यक्ष शिवाजी भगत, निशांत गिल, लड्डी सिध्दू आणि शमशेर सिंह आदी उपस्थित होते.

Check Also

भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …

Leave a Reply