Breaking News

कारच्या धडकेत तिघे जखमी

पनवेल : बातमीदार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एका भरधाव कारने दुसर्‍या कारला दिलेल्या धडकेत आरोपीसह अन्य दोघे जखमी झाले आहेत. अतुल प्रदीप एप्तवाल (22, हरियाना), अकुलसिंग धर्मेंद्र सिंग गोत खुब्बड (18, हरियाना) अशी जखमींची नावे आहेत. यात चालक अमन चौधरीही जखमी झाले आहेत.अमन हरदीपसिंग चौधरी हा आपली ब्रिजा कार (एचआर 85-8761) ही मुंबई बाजूकडून पुणे बाजूकडे भरधाव वेगाने चालवत घेऊन येत होता. त्या वेळी पुढे जाणार्‍या मोटारने ट्रक (जीजे 04-एटी 9074)ला पाठीमागून धडक दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक शैलेश ठाकूर करीत आहेत. दरम्यान, एक्स्प्रेस वेवर अपघातांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत असून, त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply