Breaking News

105 वर्षीय वृद्धावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

पनवेल : बातमीदार

पनवेलच्या लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटमध्ये बिहारमधील 105 वर्षीय व्यक्तीवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. इतक्या वर्षांच्या वयोवृद्धावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करणे ही बाब दुर्मिळ असून, ती घटना पहिलीच असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बिहारमधील पाटणा विधानसभा मतदारसंघातून 1962 आणि 1967मध्ये आमदार झालेले बद्री राम महारा त्यांच्या पणतूसोबत पनवेलमध्ये आले होते. चष्म्याशिवाय वाचू शकणारे आणि नियमितपणे व्यायाम करणारे महारा शस्त्रक्रिया करण्यासाठी तयार झाले. लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या मोतीबिंदू विभागाचे डेप्युटी डायरेक्टर डॉ. विजय शेट्टी यांनी ही शस्त्रक्रिया केली. महारा तंदुरुस्त असल्याने शस्त्रक्रिया व्यवस्थित होऊ शकली, असे डॉ. शेट्टी यांनी सांगितले.

ही अभिमानाची बाब : डॉ. हळदीपूरकर

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक अधिकारी, कलाकार डोळ्यांवर उपचार करण्यासाठी पनवेलच्या लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटला भेट देतात, मात्र 105 वर्षांच्या व्यक्तींवर दुर्मिळ मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची संधी मिळाली आणि ती यशस्वी झाली, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे  लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटचे वैद्यकीय संचालक व प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर यांनी म्हटले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply