Breaking News

पनवेलमध्ये नाट्य स्पर्धा

पनवेल : बातमीदार

येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात नाट्य स्पर्धा आयोजित करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या स्पर्धात्मक कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रमा भोसले, नाट्य स्पर्धेच्या परीक्षक प्रा. संगीता जाधव, प्रमुख अतिथी बँक ऑफ महाराष्ट्रच्या नवीन पनवेल शाखेचे विशेष सहाय्यक अरविंद मोरे, प्रा. डॉ. सुविद्या सरवणकर, प्रा. डॉ. सुनीता लोढे, प्रा. डॉ. रमेश भोसले, प्रा. डॉ. जोशी, प्रा. डॉ. नीलिमा मोरे आदी उपस्थित होते. या वेळी सर्वप्रथम शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढून देखाव्यातून सादरीकारण करण्यात आले. त्याचप्रमाणे पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यानंतर संभाजीराव बाबुराव भोसले आयोजित नाट्य स्पर्धेत शिवजन्म, स्वराज्याची स्थापना, गड आला पण सिंह गेला, स्त्री दाक्षिण्य, अफझलखानाचा वध, राज्याभिषेक असे विविध नाट्याविष्कार सादर झाले. नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक गड आला पण सिंह गेला, द्वितीय स्त्री दाक्षिण्य व तृतीय क्रमांक राज्याभिषेक या नाट्यास देण्यात आला; तर उत्कृष्ट अभिनेता सुरेश गावंड व उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून अंकिता वाघमारे यांची निवड करून त्यांनाही गौरविण्यात आले. महाविद्यालयाचा विद्यार्थी व सुप्रसिद्ध छायाचित्रकार मंदार लेले यांनी नाट्यस्पर्धेचे उत्कृष्ट छायाचित्रण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना पाटील व अंकिता वाघमारे यांनी केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply