पनवेल : रामप्रहर वृत्त
भजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील भजनी मंडळांना साहित्याचे वितरण करण्यात आले. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा शुक्रवारी (दि.११) पनवेलमध्ये उत्साहात पार पडला.
या सोहळ्याला भाजप प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य आत्माराम भस्मा, कमला देशेकर, निकिता खारकर, अनन्या गाताडे, प्राची जाधव, सोनाली जितेकर, प्राची जाधव, नेहा पारंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांच्यासह पदाधिकारी, मंडळांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी भजनाची परंपरा ही समाजाची खरी आवश्यकता आहे, असे सांगून ती जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने घेतलेल्या पुढाकाराबद्दल आणि राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर व सहकाऱ्यांचे कौतुक केले.
गणेशोत्सवात गावोगावी रात्रीच्या सुमारास भजनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा वेळी ग्रामीण भजनी मंडळांना या साहित्याची आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेने भजनी मंडळांना साहित्याचे वाटप केल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Check Also
समरसता संकल्प अभियानांतर्गत पनवेलमध्ये कार्यक्रम; विद्यार्थ्यांचा गौरव
संत रोहिदास महाराजांच्या कार्याला मान्यवरांकडून उजाळा पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या वतीने संत रोहिदास …
RamPrahar – The Panvel Daily Paper