Breaking News

म्हसळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची नाशिकला बदली

म्हसळा: प्रातिनिधी : म्हसळा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची नाशिक शहर पोलीस स्टेशनला नुकतीच बदली झाली. अत्यंत कमी कालावधीत कोल्हे यांनी म्हसळा तालुक्यात चांगली कामगिरी केली होती.

29 जून 2018 रोजी कोल्हे यांनी म्हसळा पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारला होता. कोल्हे यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे तालुक्यात  कोणतीही घटना घडल्यास कोल्हे यांना पूर्वसूचना मिळत असे. त्यामुळे म्हसळा तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारीची संख्या कमी होती. अल्प कालावधीतच कोल्हे यांची बदली झाल्याने म्हसळावासीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रवीण कोल्हे यांनी म्हसळा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून उत्तम जबाबदारी केली.  प्रवीण कोल्हे यांचा सत्कार 18 गाव आगरी समाज अध्यक्ष व माजी सभापती महादेव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply