Breaking News

माथेरान घाटरस्त्याला दरडींचा धोका

लोखंडी जाळ्या बसवण्याची नगराध्यक्षा सावंत यांची मागणी

कर्जत: प्रतिनिधी : नेरळ-माथेरान घाटरस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने तयार केला असून घाटात दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळत असल्यामुळे प्रवाशांनी भीती व्यक्त केली आहे. या दरडी कोसळू नयेत यासाठी शासनाने लोखंडी जाळ्या बसवाव्यात, अशी मागणी माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पावसाळ्यात बंद असलेल्या मिनिट्रेननंतर नेरळ-माथेरान घाटरस्ता दरडी कोसळून बंद पडण्याच्या घटना घडत असतात. नुकतेच नेरळ-माथेरान या 7 किलोमीटर लांबीच्या घाटरस्त्याचे मजबुतीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी केले आहे. मात्र या घाट रस्त्यात दरडी कोसळून जीवित हानी टाळण्यासाठी नेट बसविणे गरजेचे असल्याचे प्रेरणा सावंत यांनी म्हटले आहे.

माथेरानला मोठ्या प्रमाणात होणार्‍या पावसामुळे या घाट रस्त्यात अनेक धबधबे आहेत. त्यामुळे नेरळ-माथेरान घाटामधील काही भाग हा अत्यंत धोकादायक बनला आहे. विशेष करून चांगभलेचे मंदिर, तेथे असणारे वळणावर असलेली दरड आणि वॉटर पाईपच्यावर असणारी दरडही पावसाळ्यात कधीही पडून जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून लोखंडी जाळ्या बसवाव्यात, अशी मागणी होत आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply