पेण ः प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांना मदतीचा हात देत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष मीराताई आंबेडकर, कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्या अनुषंगाने पेण तालुक्यासह रामवाडी येथील हुतात्मा चौकात गरीब-गरजूंना चटई, ब्लँकेट, टॉवेल, बेडशीट, चादर अशा वस्तूंचे वाटप भारतीय बौद्ध महासभा पेण तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनावणे, सरचिटणीस सचिन कांबळे, हरिश्चंद्र गायकवाड, पर्यटन विभाग उपाध्यक्ष संतोष आडसुल, भगवान शिंदे, विनोद बनसोडे, मधुकर गायकवाड, महिला आघाडीच्या रश्मी जाधव, सविता सुर्वे, सचिन सोनावणे, नरेश सताणे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.