Breaking News

सुधागड तालुक्यात महावितरण ‘फेल’

पहिल्याच पावसात ऑनलाइन कामांचा बट्ट्याबोळ; वीजपुरवठा खंडीत

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. या पहिल्याच पावसात बत्ती गुल झाल्याने विज वितरण कंपनी नापास झाल्याचे बोलले जात आहे. उन्हाळ्यात वीजपुरवठा सातत्याने खंडीत होत होता. तशाचप्रकारे पावसाळ्यातदेखील विजबत्ती गुल होत असल्याने जनतेत नाराजीचा सूर उमटत आहे.

पूर्वमोसमी पावसाने सुधागड तालुक्यात हजेरी लावली असली तरी अजूनही पावसाची उघडझाप सुरु आहे. अशातच वीजपुरवठा खंडीत होताच नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील पालीसह परळी, पेडली, वर्‍हाड जांभुळपाडा या गावांना तर विजेची समस्या नित्याचीच झाली आहे. विजेअभावी शासकीय, निमशासकीय कार्यालयातील ऑनलाईन कामे रखडली जात असल्याने नागरिकांचा वेळ, श्रम व पैसा वाया जात आहे. पावसाळ्यापूर्वी विजेशी संबंधित कामे करण्याच्या नावाने दिवसभर वीजपुरवठा खंडित केला जात असे. त्यानंतर आता पावसाळा सुरु झाल्यानंतरही वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने जनतेतून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे.

चार घरांवर कोसळले विजेचे खांब

पेण : प्रतिनिधी

तालुक्यात मंगळवारी (दि. 11) रात्री विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला. या वेळी बळवली ग्रामपंचायत हद्दीतील दर्गावाडी येथे पडलेल्या वादळी पावसात विजेचे चार खांब आदिवासींच्या घरांवर कोसळले. तर वीजवाहिन्या अंगावर पडून शेतात बांधलेला बैल जागीच मृत झाला. वीजवितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना या घटनेची माहिती सरपंच संजय डंगर यांनी दिली. ग्रामीण भागातील असे अनेक निकामी, गंजलेल्या विजेचे खांब न बदल्याने दर्गावाडीवर झालेल्या घटनेतून वीजवितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी बोध घ्यावा अशा नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पेण तालुक्यात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यात  दर्गावाडीतील चार घरांवर विजेचे खांब कोसळले. या घटनेची माहिती सरपंच संजय डंगर यांनी महावितरणचे अधिकारी व कर्मचार्‍यांना दिली. त्यांच्याकडून वीज प्रवाह बंद होईपर्यंत शेतात बांधलेल्या बैलाच्या अंगावर वीजवाहिन्या पडून त्याचा जागीच मृत्यू झाला.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply