उरण ः प्रतिनिधी : पूर्वापार सुरू असलेली साई-पनवेल ही एसटी बस मागील वर्षी 1 एप्रिल 2018 रोजी साई गावात येणे बंद करण्यात आले होते, पण साई गावातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नातून ही एसटी बससेवा काल रात्रीपासून उरणचे आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते साई गावातील एसटी बस स्टँड येथे बसला पुष्पहार अर्पण करून तसेच नारळ वाढवण्यात येऊन सुरू करण्यात आली.
मागील वर्षी 1 एप्रिल 2018 रोजी पनवेल-साई एसटी बस घेऊन येणार्या चालक आणि वाहकाला नळाच्या पाण्याने जेवणाचा डबा धुण्यावरून झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर मारहाणीत होऊन परिवहन महामंडळाच्या कर्मचार्याला मारहाणप्रकरणी साई येथील इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे क्षुल्लक कारणावरून परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकास मारहाण झाल्यामुळे पनवेल एसटी डेपो व्यवस्थापनाने साई गावात जाणारी एसटी बससेवा बंद करून गावाबाहेर 500 मीटर अंतरावर असलेल्या आर्शिया कंटेनर गोदामाजवळ थांबविण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती.