Breaking News

धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे महत्त्वपूर्ण -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याची काळजी घेणे महत्त्वपूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सायकल साहस मोहिमेच्या शुभारंभावेळी केले.
आरोग्य, निसर्ग संवर्धन आणि इंधन बचतीबाबत जनजागृती करण्यासाठी राजकिशोरी लांगे यांच्या वतीने पनवेल ते दुर्गराज रायगड सायकल मोहीम 10 व 11 ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. या वेळी त्यांनीही सायकलिंग करून मोहिमेत सहभाग घेतला आणि या मोहिमेमुळे इतरांनाही आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे सांगितले.
या मोहिमेवेळी राजकिशोरी लांडगे, राजेश देशपांडे, रंगनाथ मुगळिहाळ, विवेक आपटे, सोनल भोमे, अमोल समुद्र, चंद्रशेखर कमल, विष्णू जगताप, मंगल भानुशाली, भुजंग लोखंडे, लक्ष्मण नलावडे आदी उपस्थित होते.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply