Breaking News

रोहा तालुका भाजप ओबीसी मोर्चा पदाधिकारी जाहीर

रोहे : प्रतिनिधी

भाजप ओबीसी मोर्चाच्या रोहा तालुका उपाध्यक्षपदी विशाल दळवी, प्रवीण कोतवाल व अनंता बिरगावले यांची तर  चिटणीसपदी  मारुती चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना पाली (ता. सुधगड) येथे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भाजपच्या जिल्हा बैठकीत नियुक्तीपत्रे देण्यात आली.

पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार आणि मंडळ अध्यक्ष सोपन जांभेकर, सरचिटणीस संजय लोटनकर व आनंद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुका ओबीसी मोर्चा अध्यक्ष जयेश माने यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.

या जिल्हा बैठकीत मन की बात आणि कमळ ज्योती कार्यक्रम मंडळ स्थरावर राबवण्याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले.

भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, रोहा तालुका मंडळ अध्यक्ष सोपन जांभेकर, मंडळ सरचिटणीस संजय लोटनकर, आनंद लाड, प्रभारी शहर अध्यक्ष शैलेश रावकर, तालुका ओबीसी मोर्चा अध्यक्ष जयेश माने, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष बबलू सय्यद, विनायक महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply