पनवेल ः मिडलक्लास हाऊसिंग सोसायटी मैदानावर सोसायटी क्रिकेट क्लबतर्फे क्रिकेट कोचिंग अॅकॅडमी सुरू करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी उद्योजक राजू गुप्ते, किरण मनोरे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, सुनील मोरे, निलेश पाटील, गणेश कडू, प्रशांत पोतदार, प्रशांत झुंजारराव, उल्हास झुंजारराव, सुमित झुंजारराव आदी उपस्थित होते.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper