उरण : वार्ताहर – दिघोडे ग्रामपंचायतीवर अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता होती, मात्र गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत ही काँग्रेसची सत्ता उलथून भाजप शिवसेना शेकाप अशी आघाडीची सत्ता आली. या वेळी आघाडीतर्फे गावकर्यांना घंटा गाडीचे वचन दिले होते. आज या वचनपूर्तीसाठी सरपंच सोनिया घरत, उपसरपंच शारदा कासकर, मा. उपसरपंच प्रफुल्ल पाटील, कविता म्हात्रे, पूजा पाटील, ऊर्मिला कोळी यांच्या सौजन्याने घंटागाडी आणून ग्रामपंचायतीतर्फे लोकार्पण केले.
या घंटागाडीच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी सरपंच सोनिया घरत, उपसरपंच शारदा कासकर, मा. उपसरपंच प्रफुल्ल पाटील, सदस्य कविता म्हात्रे, पूजा पाटील, ऊर्मिला कोळी, जय मातादी ग्रुपचे अध्यक्ष मयूर घरत, प्रल्हाद कासकर, ग्रामसेविका मत्स्यगंधा पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.