खोपोली : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्ष खोपोली शहर आणि खालापूर तालुका सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ शनिवारी (दि. 6) पक्षाचे कर्जत विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष तथा माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते खोपोलीतील ब्राम्हण सभा सभागृहात करण्यात आला.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास ठोंबरे, चिटणीस शरद कदम, खालापूर तालुका अध्यक्ष बापू घारे, तालुका सरचिटणीस सनी यादव, खोपोली शहर अध्यक्ष श्रीकांत पुरी, शहर सरचिटणीस दिलीप पवार, सूर्यकांत देशमुख, दिलीप देशमुख, रोहिदास पाटील, चंद्रआप्पा अनिवार, निलेश मांगले, हेमंत नांदे, सोशल मिडिया जिल्हा सहसंयोजक राहुल जाधव, शहर संयोजक प्रिन्सी कोहली, महिला मोर्चा शहर अध्यक्षा रसिका शेट्टे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष शोभा काटे, विमल गुप्ते अश्विनी अत्रे, सुनिता पाटणकर, अनिता प्रधान, वंदना लिमये, श्रद्धा गोसावी, युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुलकर यांच्यासह भाजपचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थीत होते.