Breaking News

कर्जतचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पाहून मणिपूर राज्यातील अधिकारी खूश

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

नगरपालिकेच्या माध्यमातून कर्जतमध्ये उभारण्यात आलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा शून्य कचरा डेपो बनला आहे.  या कचरा डेपो परिसराची पाहणी केल्यानंतर मणिपूर राज्यातून आलेल्या अधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले.

कर्जत नगर परिषदेचा शून्य कचरा डेपो पाहण्यासाठी मणिपूर राज्यातील अधिकार्‍यांचे शिष्टमंडळ आले होते. कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे  यांनी स्वागत केल्यानंतर शिष्टमंडळातील सर्व सदस्य घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पाहण्यासाठी पोहचले. कोकरे यांनी  घनकचरा, त्याची विल्हेवाट आणि त्यातून उत्पन्न निर्माण करणे याविषयी माहिती दिली. या मोहिमेत नागरिकांचा चांगला पाठिंबा आणि सहभाग मिळत आहे. ज्या प्रकारे कचर्‍याचे संकलन केले जाते, त्याची माहिती देऊन कोकरे यांनी नागरिकांचेही आभार मानले. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी यावेळी मणिपूर राज्याच्या नगरविकास विभागाच्या अधिकार्‍यांशी इंग्रजीतून संवाद साधला. लातूर शहरातून आलेल्या छाया काकडे यांनी त्यांच्या सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचा प्रवास, खडतर आव्हाने, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, त्यांना मिळालेल्या बिल गेट्स फौंडेशनची मदत याबद्दल माहिती दिली. त्यावेळी कर्जतचे नगरसेवक बळवंत घुमरे, सोमनाथ ठोंबरे, उमेश गायकवाड, विवेक दांडेकर, नगरसेविका स्वामिनी मांजरे, संचिता पाटील, पुष्पा दगडे, मधुरा चंदन, ज्योती मेंगाळ, भारती पालकर, सुवर्णा निलधे, प्राची डेरवणकर उपस्थित होत्या.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply