Breaking News

‘जलसिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सरकार सक्षमतेने काम करतेय’

कर्जत येथे भाजपचे नवीन सदस्य नोंदणी अभियान उत्साहात

कडाव : प्रतिनिधी  – रायगडमधील तत्कालीन सत्ताधार्‍यांनी धरणांसाठी शेतकर्‍यांच्या जागा अडविल्या. कामाचा प्रत्यक्ष पत्ताच नाही, तर दुसरीकडे आमचे सरकार जलसिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सक्षमतेने काम करत आहे. या देशकार्यात अनेक सामाजिक संस्था, संघटना तसेच दिग्गज नामवंतांनी आपला अमूल्य वेळ देत प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू केली आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले. भारतीय जनता पार्टीच्या कर्जत तालुक्यात झालेल्या नवीन सदस्य नोंदणी अभियान व कार्यविस्तार बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.

आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी ही भारतीयत्वाचा विचार घेऊन पुढे चालली आहे. म्हणूनच जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास दाखवून या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भरभक्कम मताधिक्याने भाजपलाच पसंती दिली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या पक्षप्रवेशाच्या भव्य जाहीर कार्यक्रमासाठी कर्जतमध्ये आले असताना त्यांनी ना. रवींद्र चव्हाण यांच्या कामाची तळमळ पाहून त्यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली. त्यानंतर त्यांनी विरोधकांना चितपट करत रायगडच्या राजकारणातील चित्र बदलले. त्याच विश्वासाने त्यांना पालघरचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली. याचे सर्व क्षेय कर्जतकरांना जाते.

शनिवारी (दि. 6) सकाळी 11 वाजता कर्जत येथील भाजपच्या प्रेरणा सभागृहात नवीन सदस्य नोंदणी, भाजप प्राथमिक सदस्यत्व अभियानासंदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चार्टर्ड अकाऊंटंट अंकुश दुर्गे, डीएनबी सर्जरी स्पेशालिस्ट सौरभ फडके, एमएससी मनोज पाटील, व्यापारी रमेश ओसवाल, अनंत गायकर, शरद म्हसे, गजानन काळे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणी केली, तर पोटल ग्रामपंचायत क्षेत्रातील पोटलवाडी येथील सलिम मालदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमासाठी कर्जत भाजपचे संपर्कप्रमुख विनोद साबळे, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सुनील गोगटे, प्रवीण पोलकम, किरण ठाकरे, दिनेश रसाळ, बळवंत घुमरे, राजेश भगत, विलास श्रीखंडे, पंकज पाटील, परशुराम म्हसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply