नाशिक ः प्रतिनिधी
नाशिक शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस पडल्याने गोदावरी नदीला पूर येऊन अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. नाशकात तीन दिवसांपासून पावसाचे आगमन झाले असून, मागील 24 तासांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. जोरदार पावसामुळे गोदावरीला पूर आला आहे. गंगापूर, पालखेड धरण समूहांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावल्याने धरणांमधील पाणीपातळीही वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.