Breaking News

जावळे, बामणडोंगरी ग्रामस्थांचे आंदोलन ; बांधकाम साहित्य पुरविण्याचे काम स्थानिकांना देण्याची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील जावळे व बामणडोंगरी ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि. 12) सिडको प्रशासन व बिल्डर्सच्या विरोधात ठिय्या आंदोलन व साखळी उपोषण केले. येथील स्थानिकांच्या जमिनी सिडकोकडून संपादित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भूखंड विकसित करण्यासाठी आवश्यक ते बांधकाम साहित्य पुरविण्याचे काम स्थानिक प्रकल्पग्रस्तांना मिळावे, अशी प्रमुख मागणी या वेळी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली.

चिंतामण गोंधळी यांच्या अध्यक्षतेखाली भानुदास कडू, संजय कडू, बाळकृष्ण कडू, अमर घरत, प्रसाद घरत, प्रमोद घरत, योगेश कडू, अनंता घरत, नैना कडू यांनी हे आंदोलन सुरू केले असून, त्यांना विविध सामाजिक संस्था, तसेच राजकीय नेत्यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. येथील भूखंडावर काम करणार्‍या बिल्डरकडे चर्चा करण्यासाठी स्थानिक गेले असता, त्यांना उलटसुलट उत्तरे दिल्याचा आरोप करून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत बिल्डर्सनी काम करू नये; अन्यथा होणार्‍या परिणामास संबंधित बिल्डर व सिडको प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा चिंतामण गोंधळी यांनी आंदोलनकर्त्यांच्या वतीने दिला आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply