Tuesday , March 28 2023
Breaking News

मधुकर जोशी यांना पुरस्कार

मुंबई ः प्रतिनिधी

राज्य शासनाच्या वतीने संत साहित्य, तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन 2018-19चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक म. रा. जोशी यांना जाहीर करण्यात आला. पाच लाख रुपये, मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. मधुकर जोशी नागपूर विद्यापीठात मराठी साहित्याचा ज्ञानकोषचे संपादक आहेत. संत तुकाराम महाराजांच्या एक हजार पृष्ठांच्या गाथेचे त्यांनी संपादन केले आहे. त्यांचे अभिनंदन होत आहे.

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply