Breaking News

कुर्ला-भीमाशंकर बसला खालापुरात अपघात

खालापूर ः प्रतिनिधी

कुर्ला बस स्थानकाची एसटी महामंडळाची बस भीमाशंकर येथे जात असताना मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर कलोते गावच्या हद्दीत माधवबागसमोर बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ही बस दोन्ही मार्गाच्यामध्ये जाऊन आदळली. या अपघातात दोन प्रवासी व बसचा चालक जखमी झाल्याने या सर्वांना महात्मा गांधी रुग्णालय कळंबोली येथे दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे वृत्त कळताच खालापुरातील सामाजिक कार्यकर्ते, प्रवासी लागलीच घटनास्थळी दाखल झाले व बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली तर जखमी प्रवासी रुग्णालयात हलवण्यात तत्परता दाखवली. सरपंच शिवाजी पिंगळे खालापूर, शिवसेना नगरसेवक अवधूत भुरके आणि आसपासच्या गावातील तरुणांनी घटनास्थळी  मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी कर्जत आगार प्रमुख यादव दाखल झाले असून जखमींची व अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांची पुढील प्रवासाची सोय करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची नावे अद्याप समजली नसून घटनेची माहिती पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली. अधिक तपास एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक यादव आणि खालापूर पोलीस करीत आहेत. उपविभागीय अधिकारी रणजीत पाटील यांनीही घटनास्थळी येऊन सूचना केल्या.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply