Breaking News

धनगर समाजाने केली माथेरानमध्ये वृक्षलागवड

माथेरान ः प्रतिनिधी

माथेरानमध्ये पावसाळ्यात   विविध संघटना तसेच राजकीय, सामाजिक मंडळींनी वृक्षारोपण करण्यासाठी सुरुवात केल्यानंतर इथला स्थानिक धनगर समाजसुध्दा मागे पडला नाही. धनगर समाजाने आपल्या समाजबांधवांना सोबत घेऊन गावातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करून गावात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात महिलांनीसुद्धा स्वेच्छेने पुढाकार घेत या गावातील होत असणार्‍या वनराईच्या र्‍हासाला लगाम घालण्यासाठी आगेकूच केली आहे.  माथेरानकरांची उपजीविका याच जंगलावर अवलंबून आहे. याकामी स्थानिक धनगर समाजाच्या युवा वर्गासह, कार्यकर्ते, महिलांनी दि. 15 रोजी गावातील मुख्य प्रवेशद्वार असणार्‍या दस्तुरीनाका, पशु दवाखान्याच्या आजूबाजूला, क्षणभर विश्रांतीसाठी उभारलेल्या मोकळ्या जागेत तसेच इंदिरा गांधी नगर भागातील मायरा पॉइंट परिसरात वृक्षारोपण केले आहे.माथेरानवर निस्सीम प्रेम असणारे, गावात नेहमीच सेवाभावी उपक्रम राबविण्यात हातखंडा असणारे धनगर समाजाचे अध्यक्ष राकेश कोकळे, उपाध्यक्ष शैलेश ढेबे, ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र ढेबे, मारुती कोकळे, शिव मल्हार ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण बावदाणे, युवा कार्यकर्ते भावेश झोरे, संतोष ढेबे, हृषीकेश झोरे, सुनील ढेबे, बिरु झोरे आणि धनगर समाजाच्या रणरागिणी महिला अध्यक्षा मनीषा झोरे, सखुबाई ढेबे, कलाताई ढेबे, यमुबाई ढेबे, दीपाली बावदाने, सुशीला जानकर, अश्विनी ढेबे यांसह अन्य कार्यकर्त्यांनी मिळून विविध रोपांची लागवड केली आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply