पनवेल मनपाचा मार्गदर्शनपर उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने गर्भाशय, मुख व स्तनाच्या कॅन्सरबद्दल जागरूकता व बचाव करण्याकरिता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सोमवारी (दि. 15) करण्यात आले होते. हे शिबिर आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या शिबिरात अनेक तज्ञांनी मार्गदर्शन केले.
या शिबिरास महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे, राजश्री वावेकर, कुसुम म्हात्रे, विद्या गायकवाड, वृषाली वाघमारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या शिबिरात कर्करोगतज्ञ डॉ. सलील पाटकर, स्त्रीरोगतज्ञ डॉ. संजीवनी गुणे, शुभदा नील, शल्यचिकित्सक डॉ. गिरीश गुणे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांतर्गत 1 आणि 2 ऑगस्ट रोजी पनवेल महापालिका क्षेत्रात असलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.