Breaking News

रायगड जि. प.च्या 564 शाळा दुरुस्तीविना

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्हा परिषदेच्या 564 शाळांच्या इमारती नादुरुस्त आहेत. जिल्हा नियोजन समितीने नादुरुस्त शाळा इमारत दुरुस्तीसाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, मात्र नादुरुस्त शाळांची यादीच अद्याप जिल्हा नियोजन समितीकडे दिली नसल्याने निधी वर्ग करण्यात आलेला नाही. त्यामुळे निधी उपलब्ध असूनही शाळा इमारतीच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे.

रोहा तालुक्यात 77, पेण 61, कर्जत 59, महाड व माणगाव प्रत्येकी 45, खालापूर 43, पनवेल 40, श्रीवर्धन 36, म्हसळा 31, सुधागड 27, अलिबाग 24, पोलादपूर 20, उरण 12, मुरूड 20, तळा 15 अशा एकूण 564 शाळांच्या इमारती नादुरुस्त झाल्या आहेत. दुरवस्था झालेल्या बहुतांश शाळांमध्येच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

शाळा दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदकडे पूर्वी दोन कोटी निधी मिळत होता. हा निधी कमी असल्यामुळे त्यात सर्व शाळांची दुरुस्ती होणे शक्य नव्हते. त्यामुळे निधी वाढवून मिळावा यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव देण्यात आले. नियोजन समितीकडून आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, मात्र नादुरुस्त शाळांची यादीच अद्याप समितीकडे दिली नसल्याने निधी वर्ग करण्यात आलेला नाही. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाला उशीर होत आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply