पनवेल : रामप्रहर वृत्त
सीकेटी विद्यालयात इंग्रजी माध्यमात लाल, हिरवा, पिवळा व निळा या चारही कुलांच्या प्रमुख, उपप्रमुख, तसेच सांस्कृतिक प्रमुख, शिस्तप्रमुख, क्रीडाप्रमुख आणि शिस्त नियंत्रक विद्यार्थ्यांचा शपथ ग्रहण सोहळा दिनांक 22 जुलै 2019 रोजी मोठ्या दिमाखात पार पाडला. या सोहळ्याला पनवेल महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी मनीषा मानकर या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या वेळी मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी शालेय शिस्तीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. प्रमुख पाहुण्या मनीषा मानकर यांनी खेळांमधल्या शिस्तीचे महत्त्व विषद करताना शिस्तबद्ध संचलनाकरिता विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सर्व विद्यार्थी प्रतिनिधींनी आपापल्या पदाची शपथ घेऊन शालेय शिस्तीची जबाबदारी स्वीकारली. या कार्यक्रमासाठी क्रीडाशिक्षक, तसेच कुलप्रमुख शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. या वेळी मुख्याध्यापक मराठी प्राथमिक माध्यम सुभाष मानकर, इंग्रजी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कोटीयन मॅडम, पर्यवेक्षिका निरजा मॅडम, पर्यवेक्षिका अय्यर मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.