उरण : वार्ताहर
लायन्स क्लब ऑफ उरणच्या वतीने उरण शहरातील गरीब व गरजूंना उन्हात व पावसाळ्यात होणारा त्रास कमी होण्यासाठी सोमवारी (दि. 22)छत्र्या देऊन मदतीचा हात दिला.
लायन्स क्लब ऑफ उरणचे सन 2019-20 चे अध्यक्ष लायन डॉ. अमोल ओंकार गिरी यांच्या या वर्षाच्या उपक्रमामध्ये पहिला समाजोपयोगी उपक्रम राबवून चांगली कामगिरी केली आहे. या उपक्रमामध्ये लायन सचिव समीर तेलंगे, खजिनदार संध्याराणी ओहोळ, लायन डॉ. प्रीती गाडे, लायन डॉ. संतोष गाडे, एम.जे.एफ. लायन सदानंद गायकवाड, एम.जे.एफ लायन संजीव अग्रवाल, लायन अॅड. दतात्रेय नवाळे व अन्य सर्व लायन सदस्यांनी सहकार्य केले. यंदा माझी लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मला आनंद वाटतो की, समाजॠणातून मुक्त होण्यासाठी, समाजोपयोगी उपक्रम राबवून समाज सेवा करण्याची मला संधी मिळाली आहे. या संधीचा फायदा गरीब गरजूंना होणार आहे. वर्षभरात असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत, असे लायन्स क्लब ऑफ उरणचे नवनिर्वाचित अध्यक्ष लायन डॉ. अमोल ओंकार गिरी म्हणाले.