Breaking News

महिंद्र सीआयई कंपनीतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम

माणगाव : प्रतिनिधी

येथील महिंद्रा सीआयई कंपोझिट डिव्हिजन कंपनीच्या  सीएसआर फंडातून कंपनी परिसरातील साले, तिलोरे व कोशिंबळे गावामध्ये 45 पथदिवे बसविण्यात आले आहेत. त्याचा सुमारे 1500 नागरिकांंना कायमस्वरूपी लाभ झाला असून, कंपनीने या पथदिव्यांच्या दोन वर्षांच्या दुरूस्ती व देखभालीची जबाबदारी घेतली आहे. कंपनीने दोन वर्षांपूर्वी माणगाव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये ‘ईन्हॅन्सींग द एम्लॉयबिलीटी कोशन्ट’ हा उपक्रम चालू केला आहे. या ऐच्छिक अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक कौशल्य वाढीसाठी हातभार लागला असून आतापर्यंत एकूण 619 विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. कंपनीमार्फत दरवर्षी वृक्षारोपण उपक्रम राबविला जातो. या वेळी  साले ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना सिडलेस लिंबूच्या रोपांचे वाटप करण्यात आले. कंपनीने ‘कपडा बॅक’ हा उपक्रम राबविला. त्या अंतर्गत परिसरातील नगरोली, वाढवन, कडापे, वारक, कशेने आणि मुठवली आदिवासी वाड्यांना एकूण 700 कपड्यांची मदत करण्यात आली. यामध्ये एकूण 430 आदिवासींनी लाभ घेतला. याव्यतिरिक्त कंपनीतर्फे शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा तसेच सुरक्षाविषयक मार्गदर्शन शिबिरही राबविण्यात आले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी कंपनीच्या सीएसआर कमिटीचे सदस्य सचिन राशिनकर, राजकुमार साळवी, देवेंद्र धनसांंडे, सागर खातू, किशोर वेदपाठक, निमंत्रित सदस्य अविनाश सहस्त्रबुध्दे, सखाराम खरंगटे तसेच संतोष काटू, मंगेश बक्कम, संजय भोनकर, समीर भोनकर, योगेश भोनकर आदी  कामगारांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply