Breaking News

किक बॉक्सिंग स्पर्धेत श्रावणी म्हात्रेला रौप्यपदक

पेण ः रामप्रहर वृत्त

पेण तालुक्यातील जिते येथील श्रावणी दिलीप म्हात्रे हिने आळंदी (पुणे) येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट किक बॉक्सिंग या राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. तिचे जितेसह पेण तालुक्यात कौतुक होत आहे. श्रावणी म्हात्रे ही केईएस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. रौप्यपदक पटकाविल्याबद्दल श्रावणीचे अभिनंदन होत आहे. हैदराबाद येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. याआधी कामोठे येथे रायगड जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंगमध्ये तिने प्रथम क्रमांक पटकाविला होता.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply