Breaking News

उरण नगर परिषदेला मिळाला जेसीबी

उरण ः वार्ताहर

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाने जेसीबी मंजूर केले होते. त्यानुसार उरण नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापनासाठी जेसीबी खरेदी केली आहे. त्याचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 26) उरण नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी, नगरसेवक तथा भाजापा उरण शहराध्यक्ष कौशिक शाह यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रभारी आरोग्य निरीक्षक महेश लवटे, माजी आरोग्य सभापती तथा नगरसेविका यास्मिन गॅस, नगरसेविका दमयंती म्हात्रे, आशा शेलार, जान्हवी पंडीत, शहर भाजपा महिला अध्यक्षा संपूर्णा थळी, अभियंता अनुपकुमार कांबळे, अभियंता झुंबर माने, नरेंद्र उभारे, प्रकाश ठाकूर आदी उपस्थित होते.

Check Also

रायगड जिल्ह्यात एकूण 69.04 टक्के मतदान

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात 69.04 टक्के …

Leave a Reply