Breaking News

आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या!, मराठा आरक्षणासंबंधी संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई ः वार्ताहर

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्याच निर्णयात आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले. त्यापाठोपाठ नाणार प्रकल्प आंदोलनातीलही गुन्हे मागे घेण्यात आले. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हेही मागे घेण्यात यावेत, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सोबतच कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठासाहित महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे ’छत्रपती शिवाजी महाराज’ असे करण्याचीही मागणी पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांत आरे आणि नाणार आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे निर्णय

घेतले आहेत. त्याअनुषंगाने मराठा आंदोलकांवरील गुन्हेदेखील मागे घेण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

ही गोष्ट घडायला नको पाहिजे होती. त्या वेळी आंदोलन करणार्‍यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र, या सगळ्यांनी दंगल नव्हे तर आंदोलन केले होते. हे आंदोलन वैयक्तिक अजेंड्यासाठी नव्हे तर समाजाच्या हितासाठी होते. त्यामुळे या मराठा आंदोलनातील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत.

– संभाजीराजे, खासदार, भाजप

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply